ग्रेस

9:55 PM Edit This 0 Comments »
संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किणाऱ्या वरती
लाटांचा आज पहारा..
***************************************************


देखणा कबीर


दिशावेगाल्या नभांची
गेली तुटून कमान
तुझ्या व्रतस्थ दू:खाचे
तरी सरे ना ईमान

जन्म संपले तलाशी
आणि पुसल्या मी खुणा
तरी वाटांच्या नशीबी
तुझ्या पायांच्या यातना

भोळ्या प्रतिद्न्या शब्दांच्या
गेली अर्थालाही चिर
कांचा वेगळ्या पा-यात
तरी देखणा कबीर !! -ग्रेस


****************************

मंदिरे सुनी सुनी

मंदिरे सुनी सुनी
कुठे न दीप काजवा
मेघवाहि श्रावणात
ये सुगंधी गारवा

रात्र सुर पेरुनी
अशी हळू हळू भरे
समोरच्या धुक्यातली
उठून चालली घरे

गळ्यात शब्द गोठले
अशांतता दिसे घनी
दु:ख बांधुनी असे
क्षितीज झाकिले कुणी?

एकदाच व्याकुळा
प्रतिध्वनित हाक दे
देह कोसळून हा
नदीत मुक्त वाहु दे..
- ग्रेस